...त्यामुळे दुध व्यवसाय संकटात: प्रकाश कुतवळ

ग्रामीण भागात शेतीबरोबरच दुध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा एक अर्थाजनाचा भाग झाला आहे.कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन झालं आणि त्यामुळे हॉटेल् व्यवसाय, आईसक्रिम व्यवसाय, बिस्कीट उत्पादन, बेकरी व्यवसाय, स्वीट होम असे अनेक उद्योग बंद पडल्याने त्याचा थेट परीणाम दुध व्यवसायावर झाला.

न्हावरे: ग्रामीण भागात शेतीबरोबरच दुध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा एक अर्थाजनाचा भाग झाला आहे.कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन झालं आणि त्यामुळे हॉटेल् व्यवसाय, आईसक्रिम व्यवसाय, बिस्कीट उत्पादन, बेकरी व्यवसाय, स्वीट होम असे अनेक उद्योग बंद पडल्याने त्याचा थेट परीणाम दुध व्यवसायावर झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दुधाचा दर कमी झाल्याची माहीती ऊर्जा उद्योग समुहाचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ यांनी दिली.

महाराष्ट्रात दररोज १ कोटी ८० लाख लिटर दुध उत्पादन होत.त्यातलं दररोज ९० ते ९५ लाख लिटर दुध पाऊच पॅकिंग व स्वीट होम यासाठी वापरल जात. उन्हाळ्यात ताक, लस्सी, फ्लेवर मिल्क, कोल्ड कॉफी, आईसक्रिम, श्रीखंड अश्या विविध उत्पादनासाठी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.परंतु संपुर्ण देशात तसंच महाराष्ट्रात १८ मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यामुळे गावोगावच्या यात्रा,धार्मिक ऊत्सव तसेच लग्न समारंभ पुर्णपणे बंद झाले या सगळ्याचा परीणाम थेट दुध आणि दुग्धजन्य यांच्या विक्रीवर झाला.त्यामुळे दुधापासुन जे उपपदार्थ बनविले जातात.त्याची मागणी ८० टक्क्यांनी घटली.तसेच पाऊच पॅकिंगची मागणी ४० ते ५० टक्क्यांनी घटली.

काही वर्षापासुन महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यांच्या दूध कंपन्यांनी शिरकाव केल्याने स्पर्धा निर्माण झाली. महाराष्ट्रात दररोज उत्पादित होणाऱ्या ९० लाख लिटर दुधापैकी जवळपास दररोज ४५ लाख लिटर दुध बाहेरच्या राज्यातील दुध व्यावसायिकांनी स्वतःकडे वळवल आणि त्याचा थेट परीणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दुधाच्या दरावर झाला.महाराष्ट्रात दुधापासुन पावडर बनविनारे अनेक कारखाने आहेत.सध्या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्याने पाऊच पॅकिंग तसेच दुधाचे उपपदार्थ यांना मागणी नसल्याने सगळ दुध पावडर बनविण्यासाठी वापरले जाते.

आज भारताकडे जवळपास २ लाख टन पावडर शिल्लक आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात पावडरची किंमत घसरलेली आहे.त्यामुळे त्याचा थेट परीणाम दुधाच्या विक्रीवर होत असल्याने शेतकऱ्यांना मिळणारा दुधाचा दर दिवसेंदिवस कमी होत आहे. एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या दुधाला ३३ रुपये एवढा दर मिळत होता.आता तो २२ रुपये एवढा मिळत आहे.आणि कोरोनाच संकट जर असच कायम राहील तर दुधाचा दर अजुनही कमी होण्याची शक्यता आहे.

Title: urja milk product president prakash kutwal facebook live
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे