दहिवडीत किरकोळ कारणातून दोघांना मारहाण

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघांवर गुन्हा दाखल

दहिवडी (ता.शिरुर) येथील ज्ञानेश्वर उकले व त्यांचा कामगार गुऱ्हाळामध्ये असताना तिघेजण दुचाकीहून त्या ठिकाणी आले.त्यांनी काहीही न बोलता उकले यांचा कामगार जगमोहन यास मारहाण करण्यास सुरवात केली.यावेळी उकले हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेले असता तिघांनी उकले यांना देखील शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण केली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

शिक्रापूर: दहिवडी (ता.शिरुर) येथील एका गुऱ्हाळाच्या कामगारास व मालकास तिघांनी किरकोळ करणातून मारहाण केल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

दहिवडी (ता.शिरुर) येथील ज्ञानेश्वर उकले व त्यांचा कामगार गुऱ्हाळामध्ये असताना तिघेजण दुचाकीहून त्या ठिकाणी आले.त्यांनी काहीही न बोलता उकले यांचा कामगार जगमोहन यास मारहाण करण्यास सुरवात केली.यावेळी उकले हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेले असता तिघांनी उकले यांना देखील शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण केली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत ज्ञानेश्वर लक्ष्मण उकले (रा.दहिवडी) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला  फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी तुकाराम कुलाळ, हनुमंत कुलाळ, गोरक्ष कुलाळ तिघे (रा. दहिवडी) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश डुकले व रविकिरण जाधव हे करत आहे.

Title: two person beat at dahiwadi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे