माजी सैनिकाने पार केले यशाचे सर्वोच्च शिखर

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सहित तिन्ही परीक्षेत निवड

भारतीय लष्करामध्ये १९ वर्षे सेवा करुन अथक मेहनतीची पराकाष्ठा करत निमगाव म्हाळुंगी(ता. शिरुर) येथील माजी सैनिक बापु यशवंत चव्हाण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क श्रेणीच्या तिन्ही परीक्षेत बाजी मारुन यशाचे सर्वोच्च शिखर पादाक्रांत केले आहे.त्यामध्ये मंत्रालय लिपिक, राज्य विक्री कर सहायक आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या तिन्ही आयोगाच्या अंतिम निवड यादीत स्थान पटकावून सर्व माजी सैनिक तसेच तरुणाईसाठी आदर्श निर्माण केला आहे.

रांजणगाव गणपती: भारतीय लष्करामध्ये १९ वर्षे सेवा करुन अथक मेहनतीची पराकाष्ठा करत निमगाव म्हाळुंगी(ता. शिरुर) येथील माजी सैनिक बापु यशवंत चव्हाण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क श्रेणीच्या तिन्ही परीक्षेत बाजी मारुन यशाचे सर्वोच्च शिखर पादाक्रांत केले आहे.त्यामध्ये मंत्रालय लिपिक, राज्य विक्री कर सहायक आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या तिन्ही आयोगाच्या अंतिम निवड यादीत स्थान पटकावून सर्व माजी सैनिक तसेच तरुणाईसाठी आदर्श निर्माण केला आहे.

निमगाव म्हाळुंगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन गावातीलच विद्या विकास मंदिर विद्यालयात त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले.घरची हलाखीची परिस्थिती असल्याने आपली जबाबदारी ओळखून वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी भारतीय लष्करात दाखल झाले. लष्करी सेवेदरम्यान उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, नवी दिल्ली, राजस्थान, मणिपूर आणि जम्मू काश्मीर सारख्या खडतर प्रदेशात सेवा करून आपल्या गावचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव रोशन केले.तसेच त्यांना अंदमान निकोबार येथे सेवेसाठी निवड होऊन देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य लाभले.

निवृत्ती नंतर आपण या मायभूमीचे काही देणं लागतो आणि त्या उपकाराची परतफेड करण्याची प्रबळ इच्छाशक्ती त्यांना अस्वस्थ करत होती. देशसेवेसोबत समाजसेवा करण्याची जिद्द त्यांना स्पर्धा परिक्षेकडे ओढू लागली.हि इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच यशाचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी त्यांनी पुण्यातील सदाशिव पेठ गाठली.अभ्यासात कुठलीही कसर न ठेवता ७ महिने कठोर आणि नियोजनबद्द अभ्यास करत असतानाच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी सर्वस्व अर्पण करून प्रथम प्रयत्नातच यशाचे सर्वोच्च शिखर गाठले. त्यांना माजी सैनिक माधव गाजरे, संभाजी चव्हाण , संदेश तानवडे आणि विनोद पडवळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

सेवानिवृत्ती नंतर स्वस्थ न बसता आयुष्याच्या दुसऱ्या अंकात यशस्वी होण्यासाठी माजी सैनिकांसाठी त्यांनी त्रिसूत्री वर भर द्यावा असे सांगितले. त्या म्हणजे योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि अभ्यासातील सातत्य. आई, वडील आणि पत्नी दिपाली यांच्या प्रोत्साहनामुळेच त्यांना हे यश संपादन करता आले असे त्यांनी "शिरुर तालुका डॉट कॉम" शी बोलताना सांगितले.

या निवडीनंतर माजी सैनिक विलास रसाळ, राजू मेहेत्रे, संतोष खनसे आणि रोहित झांबरे यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

Title: The ex soldier crossed the highest peak of success
प्रतिक्रिया (8)
 
Chetan Gholal
Posted on 8 July, 2020

Great...Bapu...Heartiest Congratulations....🎊🎉

केशव अनिल शिंदे
Posted on 7 July, 2020

खरचं आजया तरूणाईला आदर्श ठरलात सर आपण तुमचे मनापासून अभिनंदन

केशव अनिल शिंदे
Posted on 7 July, 2020

खरचं आजया तरूणाईला आदर्श ठरलात सर आपण तुमचे मनापासून अभिनंदन

केशव अनिल शिंदे
Posted on 7 July, 2020

खरचं आजया तरूणाईला आदर्श ठरलात सर आपण तुमचे मनापासून अभिनंदन

केशव अनिल शिंदे
Posted on 7 July, 2020

खरचं आजया तरूणाईला आदर्श ठरलात सर आपण तुमचे मनापासून अभिनंदन

Sachin Shinde
Posted on 7 July, 2020

खुप खुप अभिनंदन साहेब , तुमच्या कष्टाला यश मिळाले या बद्दल तुमचे आम्हा सर्व पुणे माजी सैनिकान तर्फे हार्दिक अभिनंदन, तुम्ही तुमच्या आयुष्यात अशीच यशाची गाथा लिहित राहों हीच ईश्वर चरनी प्रार्थना.

Shendge Dhananjay Rajendra
Posted on 7 July, 2020

Aadrsh vyaktimatva

Zanjad Sarika Gulab
Posted on 7 July, 2020

Heartiest Congratulations Sir...💐💐💐💐 तुम्ही आजच्या पिढीसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे... You are really brilliant Sir... खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा...तुम्ही जे यश मिळवलं ते खरच कौतुकास्पद आहे... सलाम तुमच्या यशाला...!!!!

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे