अन स्मशानभूमी बनली दारूचा अड्डा

तळीरामांवर कारवाई करण्याची मागणी

वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील स्मशानभूमी दारुड्यांनी दारूअड्डा बनवली असून दिवसाढवळ्या येथे दारुड्यांच्या मैफिली रंगताना दिसत आहे. लाखो रुपये खर्च करून अत्यंत चांगली शुशोभीकरण करून एखादया बागेसारखी बनवलेली स्मशानभूमी खरतर मरणाची भीतच दूर करते.

मांडवगण फराटा: वडगाव रासाई  (ता. शिरूर) येथील स्मशानभूमी दारुड्यांनी दारूअड्डा बनवली असून दिवसाढवळ्या येथे दारुड्यांच्या मैफिली रंगताना दिसत आहे. लाखो रुपये खर्च करून अत्यंत चांगली शुशोभीकरण करून एखादया बागेसारखी बनवलेली स्मशानभूमी खरतर मरणाची भीतच दूर करते.एकेकाळी स्मशानभुमीत जाण्यासही घाबरणारे गावकरी आता सहज फेरफटका किंवा विरंगुळा म्हणूनही या स्मशानभुमीमध्ये जात असतात.

वडगाव रासाई येथील स्मशानभुमीत मात्र वेगळा अनुभव येत असून येथे फेरफटका मारला असता आजूबाजूला देशी दारूच्या बाटल्यांचा खच पडला तसेच फिल्टर पाण्याच्या बाटल्या ढिगांनी आहेत.दारू पिणारे येथे पर्यटनाला आल्यासारखे गोल रिंगण करून बसताना दिसतात.फक्त अंत्यविधी अथवा दशक्रिया विधीसाठी हि जागा सुशोभित केली असून येथे सध्या दारू पिणाऱ्यांचे स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे.

बाजार स्थळावरून हाकेच्या अंतरावर हि स्मशानभूमी असून स्मशानभुमीत मोठी झाडे आहेत.येथे बसण्यासाठी बाकांची सोय उत्तम आहे.या सर्व पूरक बाबीचा गावातील तळीरामांनी अगदी पुरेपूर फायदा घेतलेला दिसून येत असून गावातील नागरिकांची कसलीही भीती या दारुड्यांना नाही.सहजासहजी येथे कारणाशिवाय कोणी फिरकत नाही.

दिवसभर केव्हाही आणि कितीही वेळ येथे दारू पिणे एन्जॉय केले जात असून पोलिसांना याची खबर नाही.गेले अनेक दिवस हा प्रकार चालू असून गावचे नाव खराब होत असल्याची बाब समोर येत आहे.तत्काळ यावर कारवाई होणे गरजेचे असून तळीरामांची तळी भरण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.
    

 

Title: the cemetery became a liquor den
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे