पिक उत्पादनासाठी सुपिक जमिन आणि तंत्रज्ञानावर भर द्या

कृषी संजीवनी कार्यक्रमात कृषी सहाय्यक जयवंत भगत यांचे आवाहन

पिक उत्पादनासाठी जमिन सुपिकता व तंत्रज्ञानावर भर द्यावा असे आवाहन निर्वी येथील कृषी संजीवनी कार्यक्रमात कृषी सहाय्यक जयवंत भगत यांनी केले.कोविड 19 परिस्थितीत नियमांच्या अधिन राहुन कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन संपुर्ण महाराष्ट्रात कृषी विभागाने केले असुन शिरूर तालुक्यातील निर्वी या गावातही कृषी विभागाच्या वतीने विविध योजनाची जनजागृती व्हावी व विविध पिकांचे उत्पादन वाढवून उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांच्या उपस्थित चर्चासत्र संपन्न झाले.

निर्वी: पिक उत्पादनासाठी जमिन सुपिकता व तंत्रज्ञानावर भर द्यावा असे आवाहन निर्वी येथील कृषी संजीवनी कार्यक्रमात कृषी सहाय्यक जयवंत भगत यांनी केले.कोविड 19 परिस्थितीत नियमांच्या अधिन राहुन कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन संपुर्ण महाराष्ट्रात कृषी विभागाने केले असुन शिरूर तालुक्यातील निर्वी या गावातही कृषी विभागाच्या वतीने विविध योजनाची जनजागृती व्हावी व विविध पिकांचे उत्पादन वाढवून उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांच्या उपस्थित चर्चासत्र संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी कैलास सात्रस यांनी केले विविध योजनाची माहिती देत असताना फळबाग लागवड, ठिबक सिंचन, हवामान आधारित फळपिक विमा, योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना,तसेच विविध पिकांचे तंत्रज्ञान तसेच हुमणी नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी सहायक जयवंत भगत यांनी केले

कार्यक्रमात गावच्या सरपंच  सुनिता सोनवणे उपसरपंच मनिषा कांबळे,पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे, कृषी सहाय्यक अंकुश परांडे, जयसिंग सोनवणे, आप्पासाहेब सोनवणे, रामदास सोनवणे, रामदास नलगे, गटाचे अध्यक्ष विजय रोडे,बबन वाबळे, बाळासाहेब सोनवणे,शरद सोनवणे,प्रविण सोनवणे, दत्तात्रय पवार, कुंडलिक सोनवणे,सुभाष काटे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.

 

Title: technology to increase crop production
प्रतिक्रिया (1)
 
जयवंत दत्तात्रय भगत
Posted on 6 July, 2020

मनापासून धन्यवाद

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे