त्यांनी जाता जाता थेट इशारा केला अन...

शिक्रापुर येथील चाकण चौकातला प्रकार

शिक्रापूर (ता.शिरुर) येथील चाकण चौक या गजबजलेल्या परीसरात रस्त्यावर उभे राहून सार्वजनिक ठिकाणी शरीरविक्री व्यवसायासाठी काही महिला अश्लील हावभाव करत असल्याची गोपनीय माहीती पोलिसांना मिळाली होती. तसेच काही महिला लॉजवर वेश्याव्यवसाय करत असल्याचे प्रकार अनेक दिवसांपासून शिक्रापुरमध्ये सुरु होते.त्यामुळे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी कारवाई करत २ महिलांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

शिक्रापुर : शिक्रापूर (ता.शिरुर) येथील चाकण चौक या गजबजलेल्या परीसरात रस्त्यावर उभे राहून सार्वजनिक ठिकाणी शरीरविक्री व्यवसायासाठी काही महिला अश्लील हावभाव करत असल्याची गोपनीय माहीती पोलिसांना मिळाली होती. तसेच काही महिला लॉजवर वेश्याव्यवसाय करत असल्याचे प्रकार अनेक दिवसांपासून शिक्रापुरमध्ये सुरु होते.त्यामुळे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी कारवाई करत २ महिलांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अनेक दिवसांपासून काही महिला वेश्याव्यवसाय करत असल्याच्या तक्रारी येत होत्या.शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, महिला पोलीस राणी भागवत, गिता बराटे, रुपाली निंभोरे, स्नेहल गायकवाड यांनी त्या ठिकाणी जात वाहनांच्या आडोशाला उभे राहून पाहणी केली असता त्या ठिकाणी दोन महिला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अश्लील हावभाव करून वेश्याव्यवसायासाठी खुणावीत असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलांना जागेवर पकडून ताब्यात घेण्यात आले. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी राणी पंढरीनाथ भागवत यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोन महिला महिलांविरुद्ध वेश्याव्यवसाय प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट हे करत आहेत.

Title: shikrapur polis arrest two lady
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे