शिक्रापूर, कोरेगाव आता पुढील १४ दिवस “लॉकडाऊन”

कोरोना रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांचा निर्णय

शिरुर तालुक्यातील शिक्रापूर,कोरेगाव भिमा सह आजूबाजूच्या गावांमध्ये या आठवडाभरात अनेक कोरोनाचे रुग्ण आढळून आले असल्यामुळे तसेच रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शिक्रापूर ,कोरेगाव भिमा ही गावे १४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत चे पञक देखील दोन्ही ग्रामपंचायत कडून काढण्यात आले आहे.

शिक्रापुर: शिरुर तालुक्यातील शिक्रापूर,कोरेगाव भिमा सह आजूबाजूच्या गावांमध्ये या आठवडाभरात अनेक कोरोनाचे रुग्ण आढळून आले असल्यामुळे तसेच रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शिक्रापूर ,कोरेगाव भिमा ही गावे १४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत चे पञक देखील दोन्ही ग्रामपंचायत कडून काढण्यात आले आहे.

शिक्रापूर येथे आठवडाभरात ७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर कोरेगाव भिमा मध्ये देखील रुग्ण आढळून आले. तसेच आजूबाजूच्या देखील अनेक गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये भाजीपाला व्यवसाय संबंधित जास्त व्यक्तींचा समावेश आहे. तर दररोज कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने दोन्ही ग्रामपंचायतने खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी गावामध्ये खबरदारीच्या उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे सांगत शिक्रापूर आणि कोरेगाव भिमा  मधील  ग्रामस्थ व  पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.

Title: Shikrapur Koregaon closed for next 14 days
प्रतिक्रिया (1)
 
श्री दिलीप थोरात उपसरपंच वाघाळे .
Posted on 7 July, 2020

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्थानीक प्रशासन चा निर्णाय फार महत्वाचा आहे . सरकार सर्वांच्या पर्यंत मदत पोहचू शकत नाही . त्यामुळे शिक्रापुर व कोरेगाव भिमा या ग्रामपचांयतीने घेतलेले निर्णय खुप महत्वाचा असुन त्यांचे स्वागत आहे .

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे