शिरूर बाजार समितीच्या सभापतीपदी शंकर जांभळकर

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शंकर जाभळकर यांची सोमवारी (ता. 29) बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शिरूर हर्षित तावरे यांनी जाहीर केले.

शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शंकर जाभळकर यांची सोमवारी (ता. 29) बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शिरूर हर्षित तावरे यांनी जाहीर केले.

शिरूर बाजार समितीच्या सभापतीपदीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. तर अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे 'फिल्डिंग'ही लावली होती. परंतु, अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे दिलेल्या बंद लिफाफा निवडणूक निरीक्षक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्फत पाठवण्यात आला. या लिफाफ्यात संचालक शंकर जांभळकर यांचे नाव सभापतीसाठी आले.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस अशोक पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या उपस्थितीत शंकर जांभळकर यांचे नाव जाहीर करण्यात आले. दरम्यान, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता यानंतर आज शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची विशेष सभामध्ये सभापती निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक हर्षित तावरे यांनी बोलवली होती. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आबाराजे मांढरे, शंकर जांभळकर व वसंत काका कोरेकर यांची नावे आघाडीवर होती. परंतु आजच्या या निवडणुकीत शंकर जांभळकर यांचे नाव जाहीर झाल्याने 15 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्य वर अखेर पडदा पडला.

निवडणुकीप्रसंगी राष्ट्रवादीचे संचालक शशिकांत दसगुडे, विश्‍वास ढमढेरे, प्रकाश पवार, शंकर जांभळकर, वसंत कोरेकर, मंदाकिनी पवार, विकास शिवले, सतीश कोळपे, मानसिंग पाचुंदकर, धैर्यशील उर्फ बाबाराजे मांढरे, तृप्ती भरणे, विजेंद्र गद्रे, प्रवीण चोरडिया, सुदीप गुंदेचा, बंडु जाधव. भाजपचे संचालक राहुल गवारे, संतोष मोरे, छाया बेनके, शिरूर बाजार समिती सचिव अनिल ढोकणे उपस्थित होते.

भाजपच्या दोघांच्या हाती घड्याळ
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण 19 संचालक असून, यातील18 संचालकांना मतदानाचा हक्क असून, पणन प्रक्रिया संचालकाला मतदानाचा हक्‍क नसल्याने त्यात राष्ट्रवादीचे 15 तर भाजप पक्षाचे 3 संचालक आहेत. भाजपचे बाजार समिती संचालिका छाया बेनके, त्यांचे पती संभाजी बेनके या संचालक यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला, यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची ताकद आणखीच वाढली आहे.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती पदासाठी संधी मिळाली असून, शिरूर बाजार समितीची सुरू असलेली विकासाची परंपरा पुढे नेणार आहे. बाजार समितीमध्ये शेतकरी हिताचे व शेतकऱ्यांना फायदा होईल असे निर्णय घेतले जातील याकडे सर्वाधिक लक्ष दिले जाईल. या निवडणुकीत संधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार यांचा आभारी आहे, असे शंकर जांभळकर यांनी सांगितले.

Title: shankar jambhalkar selected at sabhapati shirur bajar samiti
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे