Video: महिला सरपंचानी दिला दारू विकणाऱ्यास चोप...

पिंपरी दुमाला (ता. शिरूर) गावच्या दबंग सरपंच मनीषा खेडकर यांनी आज अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमास चोप दिल्याने व संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चांगलीच परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

पिंपरी दुमाला: पिंपरी दुमाला (ता. शिरूर) गावच्या दबंग सरपंच मनीषा खेडकर यांनी आज अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमास चोप दिल्याने व संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चांगलीच परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

पिंपरी दुमाला परिसरामध्ये सदर इसम हा गावातील काही लोकांच्या राजकीय वरदहस्तामुळे गेल्या अनेक दिवसापासून दारूविक्री करत होता.मात्र ही बाब मनीषाताई खेडकर यांना खटकत होती.या दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले होते.त्यामुळे या दारु विक्रेत्यास धडा शिकवायचा या जिद्दीने मनिषाताई खेडकर यांनी तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन शेळके पोलीस पाटील संतोष जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या दारू विक्रेत्यास चांगलाच धडा शिकवला.

या बाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सांगितले जायचे मात्र पोलीस लुटुपुटुची कारवाई करुन निघून जायचे व पुन्हा दारु धंदा जोमात सुरु व्हायचा.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे व मनीषाताई खेडकर यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.तरीही रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी व लोकप्रतिनिधींनी या अवैध व्यवसाय वरती आळा घालावा अशी मागणी मनिषाताई खेडकर व तेथील ग्रामस्थांनी केली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमातून फिरु लागताच रांजणगाव पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल जप्त केला.

Title: pimpri dumala women sarpanch beaten illegal liquor
प्रतिक्रिया (1)
 
santosh
Posted on 2 July, 2020

एक नंबर...

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे