वाघोली येथे वाइन शॉपी समोरच तरुणाला मारहाण

मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

वाघोली (ता. हवेली) येथील गेलार्ड वाईन समोर वाईन शॉपच्या मॅनेजरने एका तरुणास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.कोरोनाच्या संकटकाळात काही शर्ती व अटी वरती वाईन शॉप चालकांना दुकान चालू करण्यास परवानगी दिली आहे.

वाघोली: वाघोली (ता. हवेली) येथील गेलार्ड वाईन समोर वाईन शॉपच्या मॅनेजरने एका तरुणास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.कोरोनाच्या संकटकाळात काही शर्ती व अटी वरती वाईन शॉप चालकांना दुकान चालू करण्यास परवानगी दिली आहे.

परंतु वाईन शॉप चालकांकडून सर्रासपणे नियमांची पायमल्ली होताना दिसत आहेत.त्यातच वाघोलीतील गेलार्ड वाईनच्या मॅनेजर कडून २७ वर्षीय तरुणाला मारहाण झाल्याचा प्रकार सोशल मीडिया व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार मारहाण झालेल्या तरुणांने लोणीकंद पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.मात्र काही लोकांनी त्या तरुणावर दबाव आणत ती तक्रार मागे घेण्यास भाग पाडले आहे.त्यामुळे आता  लोणीकंद पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Title: one man beat by manager
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे