तळेगाव ढमढेरेत दोन महिन्यानंतर कोरोना बाधित

निमगाव म्हाळुंगीतही एकजण बाधित

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे कोरोना संशयित अखेर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे गावात २ महिन्यानंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून रुग्ण आढळलेल्या परिसरात ग्रामपंचायती मार्फत निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.बाधिताच्या घरातील सात जणांना होम क्वारंटाइन केले आहे.

तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे कोरोना संशयित अखेर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे गावात २ महिन्यानंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून रुग्ण आढळलेल्या परिसरात ग्रामपंचायती मार्फत निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.बाधिताच्या घरातील सात जणांना होम क्वारंटाइन केले आहे.


निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली संबंधित बाधिताचा घसा दुखू लागल्याने तो खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाला होता.त्याला कोरोणाची लक्षणे दिसताच पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात आले.

Title: one corona positive at talegoan dhamdhere
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे