त्याने कमरेला बांधलेले हत्यार काढले अन...

कोरेगाव भीमा येथे युवकाला शिवीगाळ करत मारहाण

कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील प्रताप खलसे हा युवक रात्रीच्या वेळेस घरामध्ये असताना किशोर खलसे हा घराबाहेर येऊन बडबड करू लागला. त्यावेळी प्रताप याने घरातून बाहेर येऊन पाहिले त्यावेळी प्रताप याने किशोर यास तू शिव्या देण्याचे कारण विचारले.यावेळेस किशोरने कमरेला बांधून आणलेले लोखंडी हत्यार काढून प्रतापला मारण्यासाठी झटपट करु लागला त्यावेळी प्रतापने त्याला विरोध केल्यामुळे त्याने त्याच्या जवळील लोखंडी हत्याराने प्रतापच्या गुडघ्यावर मारहाण करुन जखमी केले.

कोरेगाव भीमा: येथे एका युवकाला विनाकारण काहीही कारण नसताना शिवीगाळ करत लोखंडी हत्याराने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील प्रताप खलसे हा युवक रात्रीच्या वेळेस घरामध्ये असताना किशोर खलसे हा घराबाहेर येऊन बडबड करू लागला. त्यावेळी प्रताप याने घरातून बाहेर येऊन पाहिले त्यावेळी प्रताप याने किशोर यास तू शिव्या देण्याचे कारण विचारले.यावेळेस किशोरने कमरेला बांधून आणलेले लोखंडी हत्यार काढून प्रतापला मारण्यासाठी झटपट करु लागला त्यावेळी प्रतापने त्याला विरोध केल्यामुळे त्याने त्याच्या जवळील लोखंडी हत्याराने प्रतापच्या गुडघ्यावर मारहाण करुन जखमी केले.

तेव्हा प्रतापला वाचविण्यासाठी प्रतापचे वडील मध्ये आले असता त्यांना देखील शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली, याबाबत प्रताप शामराव खलसे रा. कोरेगाव भीमा (ता.शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन शिक्रापूर पोलिसांनी किशोर नाना खलसे (रा. कोरेगाव भीमा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन मोरे हे करत आहे.

Title: koregon bhima one person arrest by polis
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे