शिरुर तालुक्यातील ९ गावांत कोरोनाचा शिरकाव

१६ जण कोरोना बाधित

शिरुर तालुक्‍यात आज एकाच दिवशी ९ गावात १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आढळून आले आहे.यातील बरेचसे जण स्थानिक असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिरुर: शिरुर तालुक्‍यात आज एकाच दिवशी ९ गावात १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आढळून आले आहे.यातील बरेचसे जण स्थानिक असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या आठ दिवसापासून शिरुर तालुक्‍यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कामगार मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागले आहेत.भाजीविक्रेते, आडतदार, कंपनी कामगार, शासकीय कर्मचारी, शेतकरी यांचाही यामध्ये समावेश आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनावरील ताण वाढत चालला आहे.शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयात ही एकूण ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून हे चिंताजनक आहे.

शिरुर तालुक्‍यातील शिरुर २, रामलिंग रोड ३, निमगाव म्हाळुंगी १, कोरेगाव भीमा १, रांजणगाव गणपती २, शिक्रापूर २, गणेगाव खालसा ३, जातेगाव १, सणसवाडी १ असे १६ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

Title: Infiltration of corona in 9 villages of Shirur taluka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे