पुर्व हवेली परिसरात अवैध धंदे जोमात पोलीस कोमात

अवैध धंद्यावर कारवाई करण्याची नागरीकांची मागणी

हवेली तालुक्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अवैध व्यवसाय कोरोना रुग्णाचे हॉटस्पॉट केंद्र बनू पाहत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मटका, पत्तेक्लब, हुक्का सेंटर, लॉटरी सेंटर दारु विक्रीची हॉटेल,ढाबे, गावठी हातभट्टी विक्री केंद्र, गुटखा विक्री पान टपरी अशा ठिकाणावरुन कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण झाली असून येथुन पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हवेली तालुक्यातील ऊरुळीकांचन, लोणी काळभोर परिसरातील अवैध व्यवसायांवर काही दिवसापुर्वी कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले होते.

वाघोली: हवेली तालुक्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अवैध व्यवसाय कोरोना रुग्णाचे हॉटस्पॉट केंद्र बनू पाहत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मटका, पत्तेक्लब, हुक्का सेंटर, लॉटरी सेंटर दारु विक्रीची हॉटेल,ढाबे, गावठी हातभट्टी विक्री केंद्र, गुटखा विक्री पान टपरी अशा ठिकाणावरुन कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण झाली असून येथुन पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हवेली तालुक्यातील ऊरुळीकांचन, लोणी काळभोर परिसरातील अवैध व्यवसायांवर काही दिवसापुर्वी कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले होते.

तर आता हवेलीतील लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोली मधील अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या जवळील काही व्यक्तीना कोरोना लागण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका,दारु,हॉटेल धाब्यावर चोरुन दारु विक्री होत आहे . मात्र बंदी असताना हॉटेल मध्ये सर्वत्र दारूपार्ट्या जेवणावळी मध्ये मोठ्या गर्दी करून अशा प्रकारत  वाढ झालेली आहे.तसेच परिसरात मोठ्या  प्रमाणावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गावठी दारू खुलेआमपणे  विकली जात आहे.

पेरणे फाटा परिसरांमध्ये मटका व्यवसायदेखील खुलेआम सुरू असल्याचे चित्र राजरोसपणे पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी गुपचूप पणे फिरुन मटका व्यवसाय देखील सुरु आहे. एकीकडे प्रशासनाकडून गरजेच्या वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना निर्बंध लादले आहेत. परंतु अवैध धंदे खुलेआमपणे सुरु असल्याने आता हिच व्यवसायाची केंद्र कोरोना हॉटस्पॉट बनून समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत, दारूबंदी विभाग यांच्या यंञणेसह पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यावर्ती कडक कारवाई करणे  करणे गरजेचे आहे अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांना कडून केली जात आहे.

याबाबत या विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. "शिरुर तालुका डॉट कॉम" शी बोलताना त्यांनी सांगितले की गेल्या आठवडाभरात आम्ही अवैध धंद्यावर ४ ठिकाणी छापे टाकलेले आहेत.जर अजुनही लपुनछपुन अवैध धंदे चालु असतील तर तुम्ही आम्हाला माहीती द्या आम्ही कारवाई करु त्यामुळे आता पोलीस अवैध धंद्यावर नक्की कारवाई करणार का...? हे पाहणे औसुक्यचे ठरणार आहे.

Title: Illegal trades are rampant in the East Haveli area
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे