ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांसोबत वाढवा संवाद

दिवसाचे सुबद्ध नियोजन करा.T V चे वेळापत्रक बनवा.

"घरी रहा, सुरक्षित रहा" या कोरोना महामारीपासून वाचण्याच्या महामंत्रामुळे शहरांपेक्षा गावाकडे राहणेच आम्ही जास्त पसंत केले.गावाकडे गेल्यावर मोकळ्या वातावरणात मुले शेतात रमू लागले.वनभोजन करणे, बैलगाडी चालवणे, विहिरीत पोहणे, झोका खेळणे, विटीदांडू खेळणे यासारख्या पारंपरिक खेळात मग्न असतानाच शाळेतून ऑनलाइन अभ्यास सुरू झाला.शेतातील मुक्त भ्रमंतीत वावर करताना मुलांना अभ्यास नकोसा वाटू लागला.

"घरी रहा, सुरक्षित रहा" या कोरोना महामारीपासून वाचण्याच्या महामंत्रामुळे शहरांपेक्षा गावाकडे राहणेच आम्ही जास्त पसंत केले.गावाकडे गेल्यावर मोकळ्या वातावरणात मुले शेतात रमू लागले.वनभोजन करणे, बैलगाडी चालवणे, विहिरीत पोहणे, झोका खेळणे, विटीदांडू खेळणे यासारख्या पारंपरिक खेळात मग्न असतानाच शाळेतून ऑनलाइन अभ्यास सुरू झाला.शेतातील मुक्त भ्रमंतीत वावर करताना मुलांना अभ्यास नकोसा वाटू लागला.
 

नवीन आणि अवघड अभ्यास असल्याने मुलांना नुसते वाचून आणि व्हिडीओ पाहून समजण्यास कठीण जात होता.मुलाचे वर्ग वाढत असताना अभ्यासक्रम पालकांना आधी समजून घेऊन मग मुलांना समजवावा लागतो.पती नुकतेच भारतीय सैन्यातून निवृत्त होऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते.त्यांनी वेळेचे सुव्यवस्थित नियोजन केले.सकाळी योगा त्यानंतर अभ्यास, खेळ, आराम यांना स्थान दिले.मुलांना सोबत बसवून अभ्यासातील बारकावे समजावले.गणितातील शॉर्ट स्ट्रिक्स सोबत इंग्रजीतील शब्द संग्रह ही वाढू लागला.मुलांना समजू लागल्यानंतर त्यांनाही अभ्यासात गोडी वाढू लागली.

सैन्यात सेवारत असल्याने इतक्या दिवस मुलांपासून दूर राहिल्याची खंत त्यांच्या मनातून दूर झाली.आता एकत्रच वेळ घालवून, एकमेकांना समजून जवळीक वाढू लागली.शाळेतून पालकांशी, मुलाशी साधलेल्या फीडबॅक संवादाला उत्तम प्रतिसाद मिळू लागला.ऑनलाइन शिक्षणामुळे अचानक गोंधळलेली मुले आणि काळजीत पडलेल्या पालकांना सावरण्यासाठी काही बिंदू समोर आले.

दिवसाचे सुबद्ध नियोजन करा.

त्यामध्ये अभ्यासासोबत एकत्र पारंपरिक खेळ, योगा, आपसात संवादालाही स्थान द्या.मुलांना अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी विचारा,त्या सोडवण्याचा प्रयत्न करा अथवा शिक्षकांना विचारून त्यांची शंका निरसन करा.मुलांसोबत वेळ घालवा.त्यांच्या आनंदात सामील व्हा आणि त्यांना दुःखातही मदत करा म्हणजे त्याच्यासोबत संवाद वाढून त्यांना मित्रांची कमतरता भासणार नाही.मोबाईलचा वापर मुलांनी फक्त अभ्यासापूरताच करावा आणि नंतरही पालकांनी त्यांच्यासमोर मोबाईल वापरू नका.

T V चे वेळापत्रक बनवा.

त्यात तुमच्यासाठी बातम्यांसोबत त्यांच्यासाठी कार्टून चॅनललाही वेळ निर्धारित करा.येणारी प्रत्येक समस्या समाधान घेऊनच येत असते त्यामुळे समस्येला घाबरून न जाता शांत राहून त्यातून पर्याय शोधा. मोबाईल, TV च्या आभासी दुनियेपासून दूर जाऊन घरात पारंपरिक खेळ खेळा, गोष्टी सांगा, एकमेकांना समजून विचारांचे आदान-प्रदान करून संवाद वाढवा.मुले कळत-नकळत 80%  घरातील वातावरण आणि संवादाचे अनुकरण करत असतात.त्यामुळे आधी योग्य तो आपल्यात बदल करावा मग मुले आपोआपच तुमचे अनुकरण करून यशाच्या शिखरावर तुमच्यापुढं एकतरी पाऊल झेपावल्याखेरीज राहणार नाही.

जयश्री राजू मेहेत्रे (बी. ए. बी. एड)

रुई छत्रपती ता. पारनेर जि. अहमदनगर

   

Title: Enhance communication with children for online learning
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे