मालकीणीची अंत्ययात्रा पाहिली अन् संपवले आयुष्य...

सर्वात जास्त लळा लावणारा आणि इमादार प्राणी म्हणून श्वान ओळखला जातो. याच श्वानाला आपल्या मालकीचे अचानक जाण्याचा खूप मोठा धक्का बसला. आपल्या मालकीणीची अंत्ययात्रा पाहून श्वान भावूक झाला आणि त्यानेही टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. श्वानाचे मालकीणीवरील हे निस्सीम प्रेम पाहून सर्वांच्या डोळे पाणावले. या श्वानाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

कानपूर (उत्तर प्रदेश) : सर्वात जास्त लळा लावणारा आणि इमादार प्राणी म्हणून श्वान ओळखला जातो. याच श्वानाला आपल्या मालकीचे अचानक जाण्याचा खूप मोठा धक्का बसला. आपल्या मालकीणीची अंत्ययात्रा पाहून श्वान भावूक झाला आणि त्यानेही टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. श्वानाचे मालकीणीवरील हे निस्सीम प्रेम पाहून सर्वांच्या डोळे पाणावले. या श्वानाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

आपल्या मालकीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने श्वानाने अंत्ययात्रा पाहून चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आपले आयुष्यही संपवले. यानंतर मालकीणीसोबत या श्वानाची अंत्ययात्रा निघाली. ही घटना कानपूरच्या बर्रा परिसरातील आहे. या पाळीव श्वानाचे नाव जया असे होते. जेव्हा तिने तिच्या मालकीणीचा मृतदेह पाहिला तेव्हा ती कोलमडून गेली. आपल्या मालकीणीचा अचानक आपल्याला या जगातून सोडून जाणे सहन न झाल्याने तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असावा.

या श्वानाला अंत्ययात्रेला न नेता चौथ्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. शोक अनावर न झाल्याने श्वान भुंकत राहिला. आपल्या मालकीणीला पाहण्यासाठी जीवाचा आटापिटा करत राहिला. अखेर शोक अनावर झाल्याने चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. यामध्ये जागीच मृत्यू झाला. दोघांनीही एकाच वेळी जगाचा निरोप घेतला.

डॉ. अनिता सिंग हे आरोग्य विभागात सहसंचालक होत्या. त्यांचे पती हमीरपूर हे सीएमओ आहेत. तर त्याचा मुलगा तेजस देखील डॉक्टर आहे. अनिता या बऱ्याच दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत असताना निधन झाले. डॉ. तेजस यांनी सांगितले की, 'डॉ. अनीता यांना 13 वर्षांपूर्वी हा श्वान केपीएम रुग्णालयात आजारी अवस्थेत मिळाला होता. त्याला घरी आणले आणि उपचार केले. यानंतर त्यांनी त्याचे नाव जया ठेवले. या श्वानाचे आईवर अपार प्रेम होते. आईची वाट पाहात हा श्वान दाराकडे उभा राहायचा. मात्र, आपली मालकीण अचानक जाणे हा त्याच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता.'

Title: dog bitch jumps from 4th floor in kanpur at up
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे