शिरूर तालुक्यातील डॉक्टरला कोरोणाची लागण...

पाबळ (ता. शिरूर) येथील एका 48 वर्षीय नामांकित डॉक्टरांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्याची डॉक्टर पत्नी निगेटिव्ह असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.

शिरूर : पाबळ (ता. शिरूर) येथील एका 48 वर्षीय नामांकित डॉक्टरांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्याची डॉक्टर पत्नी निगेटिव्ह असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.

शिरूर तालुक्यातील प्रथमच पाबळ येथील डॉक्टर पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. या डॉक्टरच्या संपर्कात आलेले त्याचे 8 हाय रिस्क कॉन्टॅक्ट व 53 पेशंट क्वारंटाइन करण्यात आले आहेत. यामुळे पाबळ व परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून डॉक्टर कोरोनाबाधित निघाल्याने त्याच्याकडे तपासणीकरिता आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, डॉक्टरांना त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी (3 जुलै ) त्यांचे खाजगी लॅब मध्ये कोरोना तपासणी करीता नमुने पाठवण्यात आले होते. काल शनिवारी रात्री या डॉक्टरांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या भागात ग्रामपंचायत व पाबळ यांच्या वतीने जंतुनाशक फवारणी केली आहे. तर, जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे यांच्या वतीने आरोग्य, ग्रामपंचायत महसूल पोलीस व ग्रामपंचायत सदस्य अधिकारी प्रशासन यांची बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे नियोजन सुरू आहे.

Title: doctor corona virus report positive at shirur taluka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे