पुणे शहरात येणार असाल तर घ्या ही काळजी...

रिक्षा, टॅक्सी व चारचाकीमध्ये चालकासह तिघांनाच प्रवासाची परवानगी

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, त्यांवर निर्बंध घालण्यासाठी पुणे पोलिसांनीन आणखी एक नवे पाऊन उचलले आहे. शहरात रिक्षा, टॅक्सी व चारचाकी गाड्यामधून चालकासह केवळ तीन जणांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, त्यांवर निर्बंध घालण्यासाठी पुणे पोलिसांनीन आणखी एक नवे पाऊन उचलले आहे. शहरात रिक्षा, टॅक्सी व चारचाकी गाड्यामधून चालकासह केवळ तीन जणांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय, लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तीना मनाई करण्यात आली आहे, असे पोलिस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम यांनी ट्विटरद्वारे दिली.

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासुन कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज 800 ते 900 पर्यंत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासन, महापालिका व पोलिस प्रशासन सातत्याने काम करत आहे. संचार मनाई आदेश काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर नागरीक मोठ्या संख्येने घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणावर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. मोठ्याप्रमाणात नागरिक बाहेर पडत आहेत. तसेच रस्त्यावर गर्दी होऊ लागली आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा नागरीकांच्या आरोग्याच्या सुरक्षितता लक्षात घेऊन कडक पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यानुसार, आता रिक्षा, टॅक्सी व चारचाकी वाहनांमधून प्रवास करताना मर्यादा येणार आहे. त्यानुसार शहरात आता रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनातून प्रवास करताना चालकासह तीन व्यक्तींना प्रवास करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. लग्न समारंभ, अन्य सार्वजनिक व घरघुती कार्यक्रमाला ५० व्यक्तीपेक्षा जास्त नागरिक जमविण्यास मनाई करण्यात आली आहे, असे डॉ. वेंकटेशम यांनी ट्विटरद्वारे दिली. नागरीकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कड़क कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता. 3) रात्रीपासून शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी नाकेबंदी करुन नागरीकांची कसून तपासणी करण्यास सुरुवात केली. रस्त्यावर पुन्हा एकदा पोलिसांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे.

Title: corona virus pune police allowed only three peoples in vehic
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे