Video: कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेला ओढत...

एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह जमिनीवरून ओढत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील यादगीर या ठिकाणी ही घटना घडली आहे.

बंगळूर (कर्नाटक): एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह जमिनीवरून ओढत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील यादगीर या ठिकाणी ही घटना घडली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका रुग्णाचा मृतदेह अत्यंत निर्दयीपणे 500 मीटर ओढत नेण्यात आला आहे. दफन करण्यापूर्वी असा मृतदेह ओढत नेल्यामुळे या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पीपीई किट परिधान केलेले दोन वैद्यकीय कर्मचारी मृतदेह खेचत घेऊन जाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. प्रत्यक्षात गावकऱ्यांनी त्यांच्या गावात मृतदेह पुरण्यास नकार दिल्यानंतर वैद्यकीय कर्मचारी मृतदेह घेऊन गावाच्या बाहेरील भागात गेले. परंतु, त्यांनी मृतदेहांसोबत वाईट वागणूक केली. या घटनेनंतर डी. एम. कुलराम राव यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.

दरम्यान, यापूर्वीही एक व्हिडिओ बेल्लारी येथून समोर आला होता. एकामागून एक 8 कोरोना पीडितांचे मृतदेह खड्ड्यात फेकण्यात आले होते. या सर्व घटनानंतर बेल्लारीचे उपायुक्त एस. एस. नकुला यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला असून, त्याची दखल घेतली आहे. 'आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत,' असे त्यांनी सांगितले.

Title: corona virus patients dead bodies were treated in Karnataka
प्रतिक्रिया (2)
 
Ankush Lawande
Posted on 4 July, 2020

Not Goood

महेश साळुंके
Posted on 4 July, 2020

वैतागून गेले कर्मचारी

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे