शिरूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने घेतला गळफास...

शिरुर : येथील अविनाश अरुण चोरे (वय २२, रा. शिक्षक काॅलनी, रामलिंग रोड, शिरुर) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

शिरुर : येथील अविनाश अरुण चोरे (वय २२, रा. शिक्षक काॅलनी, रामलिंग रोड, शिरुर) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

किरण तुकाराम चोरे (रा. डोंगरगण, ता. शिरुर) यांनी या बाबतची खबर पोलिसांना दिली. ते मृत अविनाश याचे चुलत भाऊ आहेत. याबाबत, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ०४) अविनाश हा आई-वडीलांसह घरीच होता. दुपारी तीनच्या सुमारास त्याचे वडील शिरुर शहारात बाजारात जाऊन आले. त्यानंतर तो घरातील हाॅलमधे काही वेळ गप्पा मारत बसला होता.

आई - वडील इतर कामात असताना अविनाश याने स्वयंपाक घरात जाऊन छताच्या पंख्याच्या हुकाला सूती दोरीने गळफास घेतला. काही वेळाने त्याची आई कामानिमित्त स्वयंपाक खोलीत गेली असता आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. अविनाशच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस नाईक वैभव मोरे करीत आहेत.

Title: college student suicide at shirur taula
प्रतिक्रिया (1)
 
Vishal nanabhau Thombare
Posted on 6 July, 2020

हे जीवन पुन्हा नाही हे ज्याला समजले ना तो अशी चूक करत नाही असेल काही टेंशन तर घरातून निघून जा लांब राग शांत झाल्यावर पुन्हा आपण कुठे चुकलो यावर विचार करा आणि आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करा भावा तू गेलास तुझ आयुष्यं संपून पण मागचा विचार न्ही केला तू तुझे आई बाबा यांना किती दुःख झाले .

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे