बिग बॉस मधील अभिनेत्याला कोरोनाची लागण

बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाली आहे. थत्ते यांनी स्वतः एक व्हिडिओ शेयर करून याबाबत माहिती दिली आहे. आपल्याला कोरोना झाला असून, आपण सध्या रुग्णालयात दाखल झालो आहोत. असे थत्ते यांनी सांगितले आहे.

मुंबई: बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाली आहे. थत्ते यांनी स्वतः एक व्हिडिओ शेयर करून याबाबत माहिती दिली आहे. आपल्याला कोरोना झाला असून, आपण सध्या रुग्णालयात दाखल झालो आहोत. असे थत्ते यांनी सांगितले आहे.

कोरोना व्हायला नको म्हणून मी खूप काळजी घेतली. परंतु इतकी काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली. आता त्यामुळे कोरोनाची भीती मेली आहे, असे मत थत्ते यांनी यावेळी व्यक्त केलs. कोरोना झाला हे बरे झाले. आता त्यामुळे कोरोनाची भीती तरी गेली असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, देशात अनलॉक-१ सुरू आहे. देशातील विविध राज्यांमध्ये लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. भारतात सध्या २,२७,४३९. करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६,२५,५४४ वर पोहचली आहे. यामधील १८,२१३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३,७९,८९२ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे.

Title: bigg boss fame anil thatte cororna virus report positive
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे