अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादीत प्रवेश...

चित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मण बेर्डे या मंगळवारी (ता. 7) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

पुणे : चित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मण बेर्डे या मंगळवारी (ता. 7) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्या पुण्यातील पक्षाच्या कार्यालयात प्रवेश करणार आहेत.

बेर्डे यांच्या समवेत अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेते विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर, ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुहासिनी देशपांडे कार्यकारी निर्माते संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक अभिनेते डॉक्टर सुधीर निकम, अखिल भारतीय चित्रपट मउहामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, हे सर्वजण राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागांमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली

पडद्यामागचे कलाकार, तसेच तंत्रज्ञ तसेच अनेक चित्रपट बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी भरीव करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट व सांस्कृतिक  विभाग हा उपयुक्त ठरू शकतो, असे मला वाटते. यापुढच्या काळामध्ये मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रश्न समाजापुढे म्हणून त्यांची सोडवणूक करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे बेर्डे त्यांनी सांगितले.

Title: actress priya berde join ncp at pune office
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे