अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी दिग्दर्शकाची होणार चौकशी...

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी आपले जीवन संपविल्यामुळे बॉलिवूड मध्ये खळबळ उडाली असून, चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. अत्यंत प्रभावी व हुशार व्यक्तिमत्व असलेल्या सुशांत ने अचानक मुंबईतील बांद्रामध्ये राहत्या घरी त्याने आपले जीवन संपवले होते.

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी आपले जीवन संपविल्यामुळे बॉलिवूड मध्ये खळबळ उडाली असून, चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. अत्यंत प्रभावी व हुशार व्यक्तिमत्व असलेल्या सुशांत ने अचानक मुंबईतील बांद्रामध्ये राहत्या घरी त्याने आपले जीवन संपवले होते.

यामागील कारण मात्र अस्पष्ट असून, पोलिस सर्वच शंका तपासून पाहत आहेत. बॉलिवूड मधील अनेक कलाकारांसह फॅन्सने सोशल मिडियावर नाराजी व्यक्त करत ज्या कोणामुळे सुशांतला आत्महत्या करावी लागली असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलिवूड मध्ये नेपोटीजम होत असून, काही दिग्गज अभिनेते व प्रोडक्शन हाऊस हे मुद्दाम टार्गेट करून ठराविक अभिनेता व अभिनेत्रींना डावलत असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर मुंबई पोलिसांनी सर्वच शंका तपासताना मोठ्या व्यक्ती व त्याच्या जवळील व्यक्तींच्या चौकशीला सुरुवात केली होती.

दरम्यान, आता प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांची देखील चौकशी केली जाईल असे, वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. सुशांत सिंह राजपूतला भंसाळी यांनी दोन मोठ्या चित्रपटासाठी साईन केले होते असे समजत असून, नंतर मात्र प्रोडक्शन हाऊस च्या नाराजीमुळे त्याला काढण्यात आले होते. बाजीराव मस्तानी व रामलीला या दोन चित्रपटांची मुख्य भूमिका त्याला देण्यात आली होती असे देखील समजत आहे.

Title: actor sushant singh rajput case police inquiry director
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे